Posts

फिशरमॅन व्हिलेज

Image
       लॉकडाऊनच्या 8 महिन्याच्या तुरूंगवासानंतर फायनली शहराच्या बाहेर कुठेतरी फिरायला संधी मिळाली. निमित्त होतं दिवाळी सुट्टीचं. एवढ्या महिन्यानंतर पिकनिकचा प्लॅन करायचा यातच अधिकतर उत्सुकता होती. नुसतं कल्पनेनंच मन भरून आलेलं.. ही जरी अतिशयोक्ती वाटत असली तरी आत्ताची वस्तुस्थिती पाहता बहुतांशी जणांची तरी हीच भावना असणार.         दिवाळी सुट्टी आणि चिल्ड्रन डे यांचं औचित्य साधून आम्ही फॅमिली पिकनिकला जाण्याचा प्लॅन केला. कोरोनाची भिती होतीच  पण इतके महिने घरात बसून मनावर आलेलं दडपण, थकवा हा जास्त होता, म्हणून प्रत्येकाने स्वत:ची पूर्ण काळजी घ्यायची असं ठरवून पिकनिकला जायचं पक्कं केलं. त्यासाठी अगदी जवळचंच ठिकाण निश्चित केलं, ते म्हणजे 'फिशरमॅन व्हिलेज.'            पालघरमधल्या सफाळे येथे हे रिसॉर्ट आहे. सफाळे रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 20 मिनीटांच्या अंतरावर हे रिसॉर्ट असल्याने प्रवासाचीही काही अडचण नाही. कारने जायचे असल्यास विरारपासून अवघ्या दीड तासात आपण येथे पोहोचतो. इकडे बुकिंग...

24/7 घरात बसणं...

Image
      24/7 घरातं बसणं... यावर आत्ताच्या घडीला सगळ्यांची रिअँक्शन एक हात डोक्यावर, एक हात कंबरेवर आणि बटाट्यासारखे डोळे मोठे करून  बापरे !  😧😮 अशीच असेल.       साहजिकच आहे, सवयच नाहीये ना. हा एक-दोन दिवस काहि जण पूर्ण वेळ घरात बसू शकतात. पूर्ण आठवडाभर काम केल्यावर एक दिवसाची सुट्टी घरातच घालवावी, आराम करावा, घरातील काही कामं असतील तर ती आटोपून घ्यावी, पुढच्या आठवड्याची तयारी करायची किंवा निवांत पडून राहून पुस्तक वाचायचं, नाहितर वेबसिरीज, मुव्ही बघुन घ्यायचं.  काही नाहितर कुंभकर्णा सारखं झोपून राहायचं आणि आयत्या बिळावर नागोबा सारखं दोन वेळचं जेवण जेवून घ्यायचं.        मात्र, त्यालाही काहिक अपवाद आहेत. अख्खा आठवडा काम केल्यावर एक दिवस पार्टी तो बनता है बॉस  !! मग तर काय फक्त मज्जाच करायची असेल तर लंच पार्टी, डीनर पार्टी अरेन्ज करायची. नाहि तर ट्रँकिंग किंवा जवळच्या ठिकाणी पिकनीकला जायचं. या एक दिवसातही काहि जणं पायाला भिंगरी लावल्यागत इकडे-तिकडे हिंडत असतात. विन्डो शॉपिंग, शॉपिंग, खाऊ गल्लीचं खा...

नदी के उस पार...

Image
नदी के उस पार...     फ्रेडी डिकोस्टा    एकीकडे स्मार्ट सिटी , मेक इन इंडियाची स्वप्न पाहणाऱ्या देशातलं आणखी एक वास्तवादी चित्र.. ओडिसातला हा एक व्हिडीओ... मोठी मोठी स्वप्न दाखवणाऱ्या सरकारला उघडं पाडणारा हा व्हिडीओ.. ओडिसातील बांगरीपोसी गाव.. शाळेत जाण्यासाठी या गावातल्या मुलांना दुसऱ्या गावात जावं लागतं. दुसऱ्या गावात जाताना एक नदी लागते, आणि येथूनच गावातल्या मुलांची तारेवरची कसरत सुरु होते.    दररोज या मुलांना ही नदी ओलांडून शाळेत जावं लागतं.. शाळेचं बॅग, कपडे डोक्यावर घेऊन हळु-हळु पावलं टाकत नदी   ओलांडावी लागते... आजची सद्द स्थिती. ओडिसातील बांगरीपोसी गावातील विद्यार्थी नदी ओलांडताना  सौ. एएनआय    डिजिटल इंडियामधलं हे काही एकच गावं नाहीये... अशी अनेक गावं आहेत जिथे भारताच्या भावी पिढीला उज्ज्वल भविष्याच्या पहिल्याच पायरी पासुनच संघर्ष करावा लागतोय.. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या राज्याचं विकास मॉडेल गाजलेलं त्या गुजरातमधला नर्मदा जिल्हा. 4 ऑगस्ट 2014 ला या जिल्ह्याची बातमी आलेली. या जिल्ह्यातल्या 100 वि...