फिशरमॅन व्हिलेज
लॉकडाऊनच्या 8 महिन्याच्या तुरूंगवासानंतर फायनली शहराच्या बाहेर कुठेतरी फिरायला संधी मिळाली. निमित्त होतं दिवाळी सुट्टीचं. एवढ्या महिन्यानंतर पिकनिकचा प्लॅन करायचा यातच अधिकतर उत्सुकता होती. नुसतं कल्पनेनंच मन भरून आलेलं.. ही जरी अतिशयोक्ती वाटत असली तरी आत्ताची वस्तुस्थिती पाहता बहुतांशी जणांची तरी हीच भावना असणार.
पालघरमधल्या सफाळे येथे हे रिसॉर्ट आहे. सफाळे रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 20 मिनीटांच्या अंतरावर हे रिसॉर्ट असल्याने प्रवासाचीही काही अडचण नाही. कारने जायचे असल्यास विरारपासून अवघ्या दीड तासात आपण येथे पोहोचतो. इकडे बुकिंगला मात्र अडचणी येतात. त्यामुळे साधारण महिनाभर आधी बुक केलेलं उत्तम.
रिसॉर्टमध्ये खऱ्या गावाचा फिल येण्यासाठी येथील घरं जशी आपल्याला आकर्षित करतात तशीच
इकडे असलेला बैलगाडा, कोंबडे आणि बदकंही आपलं लक्ष वेधून घेतात. या सगळ्याबरोबर आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे येथील स्विमिंगपूल... हे स्विमिंगपूल मिनी ऑलिम्पिक स्विमिंगपूलच्या आकाराचे असून त्यासाठी जवळपास 1 करोड हून अधिक खर्च केवळ स्विमिंगपूलवर करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी ही वेगळा सेक्शन ठेवलेला आहे.
सरतेशेवटी अगदी महत्त्वाचं म्हणजे पेटपूजा.... निसर्ग पाहून मन प्रसन्न होते. पण पोटाचा उदरभरणा करण्यासाठी चविष्ट जेवणाची खमंग साथ ही हवी असतेच. सो येथे व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था असते. जेवण हे आपल्या पॅकेज मध्ये सामावलेले नसते. आपण ते ऑर्डरनुसार मागवू शकतो. सकाळचा नाश्ता मात्र पॅकेजमधून दिलेला असतो.
ज्याठिकाणी स्विमिंगपूल बांधण्यात आले आहे. तिकडे सुद्धा तलाव होता. हा तलाव बुजवून पुन्हा आवश्यकतेनुसार स्विमिंगपूल बांधला आहे.. मागच्या बाजूला तलाव आणि समोर स्विमिंगपूल पाहताना खुप छान वाटते. या स्विमिंगपूलच्या बाजुला आणखीन दोन घरांचे बांधकाम सुरू आहे. तसेच तलावाच्या मधोमध रेस्टॉरंट बांधण्याचे काम हाती घेतलं आहे. थोडक्यात, हे रिसॉर्ट आणखीन डेव्हलपमेंट झोन मध्ये आहे.
(😍😍अतिमहत्त्वाचं म्हणजे फोटोशुटसाठी हे लोकेशन बेस्ट, बेस्ट, सॉलिड बेस्ट लोकेशन आहे.😍😍 )
Comments
Post a Comment