Posts

Showing posts from 2014

पालकांशी हितगुज

" पापा कहते है बडा नाम करेगा । बेटा हमारा ऐसा काम करेगा ।  मगर ये तो कोई न जाने , ये  मेरी मंजील है कहा???       खरच किती अर्थपुर्ण ओव्या आहेत. आजच्या या स्पर्धात्मक युगात वावरताना आपल्या मुलांना स्वतःचे एक विशिष्ट असे स्थान निर्माण करता यावं म्हणून आई -वडील हे जास्त प्रयत्नशील असतात. मुलं लहान असताना मुलांनी कोणत्या शाळेत जावं ,कोणाबरोबर खेळायला जावे यापासुन कोणते कपडे घालावे , काय खावं असे सर्वकाही आई -वडीलच ठरवत असतात आणि ते यथायोग्य आहे,तो त्यांचा अधिकार असतो कारण तेव्हा ती मुलं समजदार नसतात परंतु मुलं समजदार झाल्यावर त्यांच्या जीवनातील छोटे -मोठे निर्णय त्यांना स्वतःना घेण्याची संधी द्यावी. पुढे कोणते शिक्षण घ्यावे हे त्यांना त्यांच्या आवडी - निवडी नुसार ठरवू द्यावे. कारण अनेकदा  आई -वडील आपले निर्णय मुलांवर थोपवत असतात. त्यांची क्षमता,आवड लक्षात न घेता स्वतःच्या इच्छेनुसार पुढील शिक्षण क्षेत्रात त्यांना स्पर्धेसाठी उतरवत  असतात. अशावेळी ते शिक्षण त्यांच्या जीवनातील जणू एक काटाच बनत असतो. नकळत आवडत नसलेल्या त्या अभ्यासाच्या ओझ्याखाली त्या पाल्याच्या मनातील एक आनंदी जी