Posts

Showing posts from August, 2017

किती दडलंय विचारांमध्ये...

Image
    आपल्या     डोक्यात अनंत विचार असतात ..  त्या विचारांना वेळीच वाट करून देणं गरजेचं असतं .  लहान असतानाच आयुष्य किती वेगळं होतं .  डोक्यात कसले विचार नसायचे ,  ना मनात ..  पण जसजशी जीवनाची एकएक पायरी चढु लागली तसतसं विचारांशी ओळख झाली .  आता प्रश्न पडतो विचार म्हणजे काय ?  माझ्या मते एखादी गोष्ट ,  एखादं ठिकाण ,  एखादी घटना किंवा एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे विचार …   मग कधी ते चांगले असू शकतात किंवा वाईट... खरंतर चांगलं काय नी वाईट काय हे आपण नाही ठरवू शकत .  कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आणि बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो ..  त्यामुळे   मी माझ्या ब्लॉगचं नाव ‘ विचार ’ असं ठेवलंय.   माझ्या या ब्लॉगमध्ये मला जे वाटतं ,  मी जे अनुभवलं ते मी मांडणार आहे .  त्यामुळे त्याच्याशी सहमत होणं ,  न होणं हे सर्वस्वी तुमच्या हातात .  हा ,  पण त्या विचारांवर तुमचे विचार मांडायला मात्र पू र्ण मोकळीक आहे ..                   राज्यघटनेने जरी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी आपण जे बोलतो ते ऐकायला ही कुणीतरी असायला हवं. जिकड