Posts

Showing posts from 2020

फिशरमॅन व्हिलेज

Image
       लॉकडाऊनच्या 8 महिन्याच्या तुरूंगवासानंतर फायनली शहराच्या बाहेर कुठेतरी फिरायला संधी मिळाली. निमित्त होतं दिवाळी सुट्टीचं. एवढ्या महिन्यानंतर पिकनिकचा प्लॅन करायचा यातच अधिकतर उत्सुकता होती. नुसतं कल्पनेनंच मन भरून आलेलं.. ही जरी अतिशयोक्ती वाटत असली तरी आत्ताची वस्तुस्थिती पाहता बहुतांशी जणांची तरी हीच भावना असणार.         दिवाळी सुट्टी आणि चिल्ड्रन डे यांचं औचित्य साधून आम्ही फॅमिली पिकनिकला जाण्याचा प्लॅन केला. कोरोनाची भिती होतीच  पण इतके महिने घरात बसून मनावर आलेलं दडपण, थकवा हा जास्त होता, म्हणून प्रत्येकाने स्वत:ची पूर्ण काळजी घ्यायची असं ठरवून पिकनिकला जायचं पक्कं केलं. त्यासाठी अगदी जवळचंच ठिकाण निश्चित केलं, ते म्हणजे 'फिशरमॅन व्हिलेज.'            पालघरमधल्या सफाळे येथे हे रिसॉर्ट आहे. सफाळे रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 20 मिनीटांच्या अंतरावर हे रिसॉर्ट असल्याने प्रवासाचीही काही अडचण नाही. कारने जायचे असल्यास विरारपासून अवघ्या दीड तासात आपण येथे पोहोचतो. इकडे बुकिंगला मात्र अडचणी येतात. त्यामुळे साधारण महिनाभर आधी बुक केलेलं उत्तम.       या रिसॉर्टचा परिसर अतिशय नि

24/7 घरात बसणं...

Image
      24/7 घरातं बसणं... यावर आत्ताच्या घडीला सगळ्यांची रिअँक्शन एक हात डोक्यावर, एक हात कंबरेवर आणि बटाट्यासारखे डोळे मोठे करून  बापरे !  😧😮 अशीच असेल.       साहजिकच आहे, सवयच नाहीये ना. हा एक-दोन दिवस काहि जण पूर्ण वेळ घरात बसू शकतात. पूर्ण आठवडाभर काम केल्यावर एक दिवसाची सुट्टी घरातच घालवावी, आराम करावा, घरातील काही कामं असतील तर ती आटोपून घ्यावी, पुढच्या आठवड्याची तयारी करायची किंवा निवांत पडून राहून पुस्तक वाचायचं, नाहितर वेबसिरीज, मुव्ही बघुन घ्यायचं.  काही नाहितर कुंभकर्णा सारखं झोपून राहायचं आणि आयत्या बिळावर नागोबा सारखं दोन वेळचं जेवण जेवून घ्यायचं.        मात्र, त्यालाही काहिक अपवाद आहेत. अख्खा आठवडा काम केल्यावर एक दिवस पार्टी तो बनता है बॉस  !! मग तर काय फक्त मज्जाच करायची असेल तर लंच पार्टी, डीनर पार्टी अरेन्ज करायची. नाहि तर ट्रँकिंग किंवा जवळच्या ठिकाणी पिकनीकला जायचं. या एक दिवसातही काहि जणं पायाला भिंगरी लावल्यागत इकडे-तिकडे हिंडत असतात. विन्डो शॉपिंग, शॉपिंग, खाऊ गल्लीचं खाणं, मुव्ही असं सगळंच एका दिवसात करून घेतात. सॉलिड एनर्जी असते बाई.        हे