Posts

कर्तृत्ववान स्त्री-शक्तीचा गौरव

Image
लोकशाही व्यवस्थेतले सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती पद. लोकशाही व्यवस्था असलेल्या या सर्वात मोठ्या देशातल्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या महिला नेता द्रौपदी मुर्मू यांची निवड होणे हा दुग्धशर्करा योग आणि सुदृढ लोकशाहीचे द्योतक आहे. जागतिक पातळीवर आज भारताला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तेव्हा आजघडीला भारताचे प्रतिनिधित्व करणे व राष्ट्रपती पद सांभाळणे हे जोखमीचे व आव्हानात्मक असताना द्रौपदी मुर्मू यांच्या सारख्या कणखर व्यक्तिमत्त्वाची निवड होणे हे अतिउत्तमच आहे. ओडिशातील संथाल कुटुंबात जन्मलेल्या द्रौपदी यांनी केवळ कुटुंबिय, समाजाच्या कल्याणासाठी आपले जीवन खर्ची केले. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांनी आपण शिक्षण पूर्ण करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी त्या नोकरी करू लागल्या. पुढे लग्न होऊन संसार सुरू झाल्यावर मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. एक आई या नात्याने त्यांनी आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले. कालांतराने त्यांनी शिक्षिका म्हणून सेवा सुरू केली. याच काळात त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य ही सुरू केले. राजकारण

मोदी विरोधासाठी देश पेटवण्याचा घातक खेळ

Image
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून काही राज्यामध्ये तरूणांच्या हिंसक आंदोलनाचे लोण पसरले. या योजनेला विरोध करण्यासाठी रेल्वे डबे जाळणे, रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणां तोडणे, दगडफेक, रस्त्यांवर सार्वजनिक, खासगी मालमत्तेची जाळपोळ, पोलिसांवर हल्ले करणे अशा अनेक हिंसक घटना घडल्या. तरूणांचे हे हिंसक आंदोलन पाहुन प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे देशाचे भावी सैनिक बनु इच्छिणारे हेच ते तरूण आहेत का ? हे हिंसक आंदोलनकर्ते देशाच्या रक्षणासाठी संरक्षणकर्ते सैनिक म्हणून दाखल होणार आहेत का ?   कारण राष्ट्राचे संरक्षणकर्ते, सैनिक बनु इच्छिणाऱ्या तरूणांच्या मनात राष्ट्राप्रती संवेदना असतात, आदर असतो. रस्त्यावर उतरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे सैन्यात दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मनोमन मान्य असेल हेच मुळी पटत नाही. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही विचार केल्यास आपल्यालाही जाणवते की , आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो, जी गोष्ट आपल्याला आपलीशी वाटते त्या गोष्टीची नासधुस, नुकसान करणे असा विचार आपल्या मनालाही शिवत नाही. अग्नीपथ ला आक्षेप घेणाऱ्या, विरोध करणाऱ्या मंडळींचे छुपे हेतू जाणून घेणे आवश्यक ठरते.    1

फिशरमॅन व्हिलेज

Image
       लॉकडाऊनच्या 8 महिन्याच्या तुरूंगवासानंतर फायनली शहराच्या बाहेर कुठेतरी फिरायला संधी मिळाली. निमित्त होतं दिवाळी सुट्टीचं. एवढ्या महिन्यानंतर पिकनिकचा प्लॅन करायचा यातच अधिकतर उत्सुकता होती. नुसतं कल्पनेनंच मन भरून आलेलं.. ही जरी अतिशयोक्ती वाटत असली तरी आत्ताची वस्तुस्थिती पाहता बहुतांशी जणांची तरी हीच भावना असणार.         दिवाळी सुट्टी आणि चिल्ड्रन डे यांचं औचित्य साधून आम्ही फॅमिली पिकनिकला जाण्याचा प्लॅन केला. कोरोनाची भिती होतीच  पण इतके महिने घरात बसून मनावर आलेलं दडपण, थकवा हा जास्त होता, म्हणून प्रत्येकाने स्वत:ची पूर्ण काळजी घ्यायची असं ठरवून पिकनिकला जायचं पक्कं केलं. त्यासाठी अगदी जवळचंच ठिकाण निश्चित केलं, ते म्हणजे 'फिशरमॅन व्हिलेज.'            पालघरमधल्या सफाळे येथे हे रिसॉर्ट आहे. सफाळे रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 20 मिनीटांच्या अंतरावर हे रिसॉर्ट असल्याने प्रवासाचीही काही अडचण नाही. कारने जायचे असल्यास विरारपासून अवघ्या दीड तासात आपण येथे पोहोचतो. इकडे बुकिंगला मात्र अडचणी येतात. त्यामुळे साधारण महिनाभर आधी बुक केलेलं उत्तम.       या रिसॉर्टचा परिसर अतिशय नि

24/7 घरात बसणं...

Image
      24/7 घरातं बसणं... यावर आत्ताच्या घडीला सगळ्यांची रिअँक्शन एक हात डोक्यावर, एक हात कंबरेवर आणि बटाट्यासारखे डोळे मोठे करून  बापरे !  😧😮 अशीच असेल.       साहजिकच आहे, सवयच नाहीये ना. हा एक-दोन दिवस काहि जण पूर्ण वेळ घरात बसू शकतात. पूर्ण आठवडाभर काम केल्यावर एक दिवसाची सुट्टी घरातच घालवावी, आराम करावा, घरातील काही कामं असतील तर ती आटोपून घ्यावी, पुढच्या आठवड्याची तयारी करायची किंवा निवांत पडून राहून पुस्तक वाचायचं, नाहितर वेबसिरीज, मुव्ही बघुन घ्यायचं.  काही नाहितर कुंभकर्णा सारखं झोपून राहायचं आणि आयत्या बिळावर नागोबा सारखं दोन वेळचं जेवण जेवून घ्यायचं.        मात्र, त्यालाही काहिक अपवाद आहेत. अख्खा आठवडा काम केल्यावर एक दिवस पार्टी तो बनता है बॉस  !! मग तर काय फक्त मज्जाच करायची असेल तर लंच पार्टी, डीनर पार्टी अरेन्ज करायची. नाहि तर ट्रँकिंग किंवा जवळच्या ठिकाणी पिकनीकला जायचं. या एक दिवसातही काहि जणं पायाला भिंगरी लावल्यागत इकडे-तिकडे हिंडत असतात. विन्डो शॉपिंग, शॉपिंग, खाऊ गल्लीचं खाणं, मुव्ही असं सगळंच एका दिवसात करून घेतात. सॉलिड एनर्जी असते बाई.        हे

नदी के उस पार...

Image
नदी के उस पार...     फ्रेडी डिकोस्टा    एकीकडे स्मार्ट सिटी , मेक इन इंडियाची स्वप्न पाहणाऱ्या देशातलं आणखी एक वास्तवादी चित्र.. ओडिसातला हा एक व्हिडीओ... मोठी मोठी स्वप्न दाखवणाऱ्या सरकारला उघडं पाडणारा हा व्हिडीओ.. ओडिसातील बांगरीपोसी गाव.. शाळेत जाण्यासाठी या गावातल्या मुलांना दुसऱ्या गावात जावं लागतं. दुसऱ्या गावात जाताना एक नदी लागते, आणि येथूनच गावातल्या मुलांची तारेवरची कसरत सुरु होते.    दररोज या मुलांना ही नदी ओलांडून शाळेत जावं लागतं.. शाळेचं बॅग, कपडे डोक्यावर घेऊन हळु-हळु पावलं टाकत नदी   ओलांडावी लागते... आजची सद्द स्थिती. ओडिसातील बांगरीपोसी गावातील विद्यार्थी नदी ओलांडताना  सौ. एएनआय    डिजिटल इंडियामधलं हे काही एकच गावं नाहीये... अशी अनेक गावं आहेत जिथे भारताच्या भावी पिढीला उज्ज्वल भविष्याच्या पहिल्याच पायरी पासुनच संघर्ष करावा लागतोय.. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या राज्याचं विकास मॉडेल गाजलेलं त्या गुजरातमधला नर्मदा जिल्हा. 4 ऑगस्ट 2014 ला या जिल्ह्याची बातमी आलेली. या जिल्ह्यातल्या 100 विद्यार्थ्यांना दररोज 600 किमी रूंद असलेली हिरण नदी