Posts

Showing posts from October, 2017

"गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी"

Image
' उठा उठा पहाट झाली , मोती स्नानांची   वेळ आली ' दिवाळी सणानिमित्ताने टिव्हीवर अॅड आल्यावरच हे ऐकायला मिळायचं.. या अॅडमध्ये मला कधी काही विशेष वाटायचं नाही कारण अभ्यंगस्नान आणि त्यात मोती साबणाचं महत्त्वच काय असतं हे माहित नव्हतं...   दोन-तीन दिवसाआधीचं म्हणजे 12 ऑक्टोबरला सतीश शिंदे सरांनी मला एक व्हॉट्स-अॅप मॅसेज केला.. दिवाळी सणाच्या आठवणीवर आधारलेला.. अंधेरीच्या प्लेटफार्म नंबर 6 वर ट्रेनची वाट पाहत उभी होती तेव्हा तो मॅसेज मी वाचला. खरंतर अंधेरी स्टेशनवर नोकरीसाठी येणं म्हणजे कोणत्यातरी चुकीची शिक्षाच मिळतंय असं मला वाटतं. एक तास बसमधुन गर्दीचे धक्के खात प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर चर्चगेटवरून येणाऱ्या भरगच्च ट्रेनमध्ये चढायचं आणि उभ्याउभ्या प्रवास करायचा असं हे रूटीन असतं. या अशा प्रवासात सगळेच प्रचंड त्रासलेले दिसतात. मनाला विरूंगुळा मिळेल असं काहीचं या प्रवासात घडत नाही उलट ट्रेन्स उशिरा आहेत किंवा अमुक-अमुक ट्रेन आज या प्लॅटफॉर्म येणार असंच काहीसं आणखीन त्रास वाढवणार ऐकायला मिळतं.. या सगळ्या थकेल्या रूटीनमध्ये 12 ऑक्टोबरच्या दिवशी आलेला   दिवाळी मॅसेजने माझ्या मन