24/7 घरात बसणं...

     



24/7 घरातं बसणं... यावर आत्ताच्या घडीला सगळ्यांची रिअँक्शन एक हात डोक्यावर, एक हात कंबरेवर आणि बटाट्यासारखे डोळे मोठे करून बापरे !  😧😮अशीच असेल. 
     साहजिकच आहे, सवयच नाहीये ना. हा एक-दोन दिवस काहि जण पूर्ण वेळ घरात बसू शकतात. पूर्ण आठवडाभर काम केल्यावर एक दिवसाची सुट्टी घरातच घालवावी, आराम करावा, घरातील काही कामं असतील तर ती आटोपून घ्यावी, पुढच्या आठवड्याची तयारी करायची किंवा निवांत पडून राहून पुस्तक वाचायचं, नाहितर वेबसिरीज, मुव्ही बघुन घ्यायचं.  काही नाहितर कुंभकर्णा सारखं झोपून राहायचं आणि आयत्या बिळावर नागोबा सारखं दोन वेळचं जेवण जेवून घ्यायचं. 
      मात्र, त्यालाही काहिक अपवाद आहेत. अख्खा आठवडा काम केल्यावर एक दिवस पार्टी तो बनता है बॉस !! मग तर काय फक्त मज्जाच करायची असेल तर लंच पार्टी, डीनर पार्टी अरेन्ज करायची. नाहि तर ट्रँकिंग किंवा जवळच्या ठिकाणी पिकनीकला जायचं. या एक दिवसातही काहि जणं पायाला भिंगरी लावल्यागत इकडे-तिकडे हिंडत असतात. विन्डो शॉपिंग, शॉपिंग, खाऊ गल्लीचं खाणं, मुव्ही असं सगळंच एका दिवसात करून घेतात. सॉलिड एनर्जी असते बाई.  
     हे सगळं करतो ते सगळं सुरू असताना पण, आत्ताच्या सारखं लॉकडाऊन असताना 😮... विचारचं करवत नाही. ना शाळेत असताना यावर कधी निबंध लिहायला आला ना अशी कल्पना करायची कधि संधी मिळाली.  पण आत्ता आत्ता आलिया भोगासी असावी सादर असं म्हणत बसूया घरात. इतके दिवस घरात करायचं काय हा प्रश्न सगळ्याप्रमाणे माझ्याही पुढे होता. पण मी लवकरच त्यावर ऑप्शन शोधला आणि आता लॉकडाऊनमध्ये सुद्धा माझा दिवस छान जातो...  मी खुप काही नविन नाही करत आहे. पण जे करायचं होतं म्हणजे ज्याच्यासाठी वेळच मिळत नाही अशी तक्रार करायची तेच सगळं आता करतेय.
     मला व्यायाम आणि त्यातल्या त्यात योगा शिकण्याचं आकर्षण होतं. सो मी या लॉकडाऊन पिरीयडमध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारचे विशेषत: मला गरज असलेले योगा प्रकार यूट्यूबवर पाहून त्याची प्रॅक्टीस सुरू केली.  यामध्ये सुर्यनमस्कार, चक्रासन, सर्वांगासन, बालासन, बटरफ्लाय पॉझ, प्रणायम हे प्रकार शिकून त्याचा नियमीत सराव करण्याचा प्रयत्न करतेय. या सर्वाला  ध्यानसाधनेचीही जोड दिली आहे.   

     कामाचा भाग म्हणून सकाळी पेपर वाचावेच लागतात. या पेपर्समध्ये लॉकडाऊनमध्ये घरून काम  करताना किंवा जनरलीच पिसी, लॅपटॉपवर काम करताना आपण आपण आपली कशी काळजी घ्यावी यांच्या टिप्स वाचून त्यांची अंमलबजावणी करायला सुरूवात केली.
     ट्रेनमध्ये विणकाम शिकल्याचा फायदाही मला आता होतोय. आता मस्त मी टेबलक्लॉथ म्हणजेच रूमाल विणतेय.
     लॉकडाऊनचा मला झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे मी सायकल चालवायला शिकली. काहिक जणं हसतील यावर पण 'सायकल चालवायची' हे माझं अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न होतं जे मला या लॉकडाऊन पिरीयडमध्ये पुर्ण करता आलं.


     या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे मला काहिशी कंटाळवाणं वाटते पण हातात घेतलंय ते पुर्ण करावंच लागेल म्हणून थोडा अभ्यास ही करावा लागतोय. सुरूवातील खुपच बोअर व्हायचं पण आता टाईमटेबल बऱ्यांपैकी सेट झालंय त्यामुळे त्यातही काही अंशी मन लागतंय.
     एका न्यूजपेपरमध्ये वाचनात आलेलं की जमेल तेवढा कमी वेळ मोबाईल, टिव्ही आणि पिसी/लॅपटॉपवर घालवावा. मला हे पटलं त्यामुळे मी शक्यतो मोबाईल आणि टिव्ही पाहणे टाळण्याचा प्रयत्न करतेय.
      या लॉकडाऊनमध्ये आणखीन एक इंटरस्टींग गोष्ट घडतेय ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि त्यांचे आवाज ऐकायला मिळणे. माझं घराच्या चहूबाजुंनी शेती आहे. थोडासा जंगला सारखाच हा भाग आहे. एरव्ही ही येथे वेगवेगळ्या पक्ष्यांचा वावर असायचा, पण अख्खा दिवस नोकरी निमित्ताने मुंबईतच घालवत असल्याने या पक्ष्यांना कधी पाहायला मिळायचं नाही. पण आता या लॉकडाऊनमुळे हे वेगवेगळे रंगाचे आणि आकाराचे पक्षी बघताना संध्याकाळ कशी निघुन जाते तेच कळत नाही.
    सो माझा लॉकडाऊनचा दिवस हा असा असतो. तुमचा लॉकडाऊनचा अनुभव आणि दिवस कसा जातो याविषयी जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. म्हणजे काही नविन आणि इंटरस्टींग असेल तर नक्कीच ते फॉलो करता येईल... कारण आणखीन दोन आठवडे घरातच काढायचे आहेत.

#STAY HOME # STAY SAFE  😊
   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नदी के उस पार...

मोदी विरोधासाठी देश पेटवण्याचा घातक खेळ