Posts

Showing posts from July, 2022

कर्तृत्ववान स्त्री-शक्तीचा गौरव

Image
लोकशाही व्यवस्थेतले सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती पद. लोकशाही व्यवस्था असलेल्या या सर्वात मोठ्या देशातल्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या महिला नेता द्रौपदी मुर्मू यांची निवड होणे हा दुग्धशर्करा योग आणि सुदृढ लोकशाहीचे द्योतक आहे. जागतिक पातळीवर आज भारताला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तेव्हा आजघडीला भारताचे प्रतिनिधित्व करणे व राष्ट्रपती पद सांभाळणे हे जोखमीचे व आव्हानात्मक असताना द्रौपदी मुर्मू यांच्या सारख्या कणखर व्यक्तिमत्त्वाची निवड होणे हे अतिउत्तमच आहे. ओडिशातील संथाल कुटुंबात जन्मलेल्या द्रौपदी यांनी केवळ कुटुंबिय, समाजाच्या कल्याणासाठी आपले जीवन खर्ची केले. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांनी आपण शिक्षण पूर्ण करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी त्या नोकरी करू लागल्या. पुढे लग्न होऊन संसार सुरू झाल्यावर मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. एक आई या नात्याने त्यांनी आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले. कालांतराने त्यांनी शिक्षिका म्हणून सेवा सुरू केली. याच काळात त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य ही सुरू केले. राजकारण

मोदी विरोधासाठी देश पेटवण्याचा घातक खेळ

Image
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून काही राज्यामध्ये तरूणांच्या हिंसक आंदोलनाचे लोण पसरले. या योजनेला विरोध करण्यासाठी रेल्वे डबे जाळणे, रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणां तोडणे, दगडफेक, रस्त्यांवर सार्वजनिक, खासगी मालमत्तेची जाळपोळ, पोलिसांवर हल्ले करणे अशा अनेक हिंसक घटना घडल्या. तरूणांचे हे हिंसक आंदोलन पाहुन प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे देशाचे भावी सैनिक बनु इच्छिणारे हेच ते तरूण आहेत का ? हे हिंसक आंदोलनकर्ते देशाच्या रक्षणासाठी संरक्षणकर्ते सैनिक म्हणून दाखल होणार आहेत का ?   कारण राष्ट्राचे संरक्षणकर्ते, सैनिक बनु इच्छिणाऱ्या तरूणांच्या मनात राष्ट्राप्रती संवेदना असतात, आदर असतो. रस्त्यावर उतरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे सैन्यात दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मनोमन मान्य असेल हेच मुळी पटत नाही. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही विचार केल्यास आपल्यालाही जाणवते की , आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो, जी गोष्ट आपल्याला आपलीशी वाटते त्या गोष्टीची नासधुस, नुकसान करणे असा विचार आपल्या मनालाही शिवत नाही. अग्नीपथ ला आक्षेप घेणाऱ्या, विरोध करणाऱ्या मंडळींचे छुपे हेतू जाणून घेणे आवश्यक ठरते.    1