Posts

खूप काही करायचंय आयुष्यात... खूप फिरायचंय, नाही फिरण्यापेक्षा भटकायचंय.. मनसोक्त. सगळ्या हौशी पूर्ण करायच्यायत.. खूप लिहायचंय, खूप वाचायचंय.. थोडक्यात सांगायचं तर या आयुष्याचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. पण काहीच मनासारखं होत नाहीये.. नेहमी कुठे न् कुठे गाडी अडकते.. बोगस वाटतं मग हे सगळं.    दररोज उठायचं आणि मग तिचं बस, तिच लोकल वारी, तोच रस्ता तेच दिवसभराचं काम. काहीच नवीन नाही.. उब आलीये या बिझी, रटाळ शेड्युलची.. हम्म्म   पण मग करणार काय? हाच 'मोठा' नाही पण प्रश्न आहे हे नक्की.. माझा एकटीचाच नाही तर या मुंबईत राहणाऱ्या कितीतरी मुंबईकरांचा.. याचं उत्तर क्वचितच कोणाकडे असते. लाईफ इंटरेस्टिंग बनवण्याचे 'फंडे' ते यालाच म्हणतात. ज्यांच्याकडे नाहीत ते थोडा वेळ शांत बसून भूतकाळ आठवतात किंवा गाणी ऐकतात नाहीतर स्वतः च्या नशिबाला आणि आयुष्याला दुषणं देत वेळ मारुन नेतात...  हे असंच असतं... चलो बाय स्टेशन आलं. पुन्हा भेटू.

किती दडलंय विचारांमध्ये...

Image
    आपल्या     डोक्यात अनंत विचार असतात ..  त्या विचारांना वेळीच वाट करून देणं गरजेचं असतं .  लहान असतानाच आयुष्य किती वेगळं होतं .  डोक्यात कसले विचार नसायचे ,  ना मनात ..  पण जसजशी जीवनाची एकएक पायरी चढु लागली तसतसं विचारांशी ओळख झाली .  आता प्रश्न पडतो विचार म्हणजे काय ?  माझ्या मते एखादी गोष्ट ,  एखादं ठिकाण ,  एखादी घटना किंवा एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे विचार …   मग कधी ते चांगले असू शकतात किंवा वाईट... खरंतर चांगलं काय नी वाईट काय हे आपण नाही ठरवू शकत .  कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आणि बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो ..  त्यामुळे   मी माझ्या ब्लॉगचं नाव ‘ विचार ’ असं ठेवलंय.   माझ्या या ब्लॉगमध्ये मला जे वाटतं ,  मी जे अनुभवलं ते मी मांडणार आहे .  त्यामुळे त्याच्याशी सहमत होणं ,  न होणं हे सर्वस्वी तुमच्या हातात .  हा ,  पण त्या विचारांवर तुमचे विचार मांडायला मात्र पू र्ण मोकळीक आहे ..     ...
वाचाल तर वाचाल. पण स्वत: वाचाल आणि ऐकाल तर विचार करून स्वत:ची मते बनवायला लागाल...

पालकांशी हितगुज

" पापा कहते है बडा नाम करेगा । बेटा हमारा ऐसा काम करेगा ।  मगर ये तो कोई न जाने , ये  मेरी मंजील है कहा???       खरच किती अर्थपुर्ण ओव्या आहेत. आजच्या या स्पर्धात्मक युगात वावरताना आपल्या मुलांना स्वतःचे एक विशिष्ट असे स्थान निर्माण करता यावं म्हणून आई -वडील हे जास्त प्रयत्नशील असतात. मुलं लहान असताना मुलांनी कोणत्या शाळेत जावं ,कोणाबरोबर खेळायला जावे यापासुन कोणते कपडे घालावे , काय खावं असे सर्वकाही आई -वडीलच ठरवत असतात आणि ते यथायोग्य आहे,तो त्यांचा अधिकार असतो कारण तेव्हा ती मुलं समजदार नसतात परंतु मुलं समजदार झाल्यावर त्यांच्या जीवनातील छोटे -मोठे निर्णय त्यांना स्वतःना घेण्याची संधी द्यावी. पुढे कोणते शिक्षण घ्यावे हे त्यांना त्यांच्या आवडी - निवडी नुसार ठरवू द्यावे. कारण अनेकदा  आई -वडील आपले निर्णय मुलांवर थोपवत असतात. त्यांची क्षमता,आवड लक्षात न घेता स्वतःच्या इच्छेनुसार पुढील शिक्षण क्षेत्रात त्यांना स्पर्धेसाठी उतरवत  असतात. अशावेळी ते शिक्षण त्यांच्या जीवनातील जणू एक काटाच बनत असतो. नकळत आवडत नसलेल्या त्या अभ्यासाच्या ओझ्याखाली ...