किती दडलंय विचारांमध्ये...
आपल्या डोक्यात अनंत विचार असतात.. त्या विचारांना वेळीच वाट करून देणं गरजेचं असतं. लहान असतानाच आयुष्य किती वेगळं होतं. डोक्यात कसले विचार नसायचे, ना मनात.. पण जसजशी जीवनाची एकएक पायरी चढु लागली तसतसं विचारांशी ओळख झाली. आता प्रश्न पडतो विचार म्हणजे काय? माझ्या मते एखादी गोष्ट, एखादं ठिकाण, एखादी घटना किंवा एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर मनात येणारी पहिली गोष्ट म्हणजे
विचार… मग कधी ते चांगले असू शकतात किंवा वाईट... खरंतर चांगलं काय नी वाईट काय हे आपण नाही ठरवू शकत. कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आणि बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो.. त्यामुळे मी माझ्या ब्लॉगचं नाव ‘विचार’ असं ठेवलंय. माझ्या या ब्लॉगमध्ये मला जे
वाटतं, मी जे अनुभवलं ते मी मांडणार आहे. त्यामुळे त्याच्याशी सहमत होणं, न होणं हे सर्वस्वी तुमच्या हातात. हा, पण त्या विचारांवर तुमचे विचार मांडायला मात्र पूर्ण मोकळीक आहे..
राज्यघटनेने जरी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी आपण जे
बोलतो ते ऐकायला ही कुणीतरी असायला हवं. जिकडे आपण जाऊ किंवा जेव्हा आपल्याला काही
सांगायचं आहे, काही शेअरींग करायचं असेल तर यासाठी 24 तास आपल्यासोबत
कोणी असेलच असं नाही. त्यामुळे त्यावेळेला ते विस्मरणात जाण्याची शक्यता असते. तर
काहीक वेळेला मला जे सांगायचंय ते ऐकण्यात समोरच्याला इंटरस्ट नसेल तर
त्याच्यासोबत त्या विषयावर मी बोलू शकत नाही. त्यामुळे मला जे वाटतं ते लिहून
काढलेलं चांगलं.. त्यामुळेच हा ब्लॉग लिहायचा प्रपंच.
2014 साली मी हा ब्लॉग सुरू केलेला पण एखाद पोस्ट नंतर दुर्लक्ष केलं.. तेव्हा
डायरी लिहायची सवय होती. त्यामुळे जे वाटायचं ते अधेमधे डायरीत लिहायची. आता मला
पुन्हा ब्लॉगची आठवण झाली आणि लिहायला सुद्धा खुप काही म्हणुन आता पुनश्च: नव्याने ब्लॉग लिहायला सुरू करतेय..
मला पुस्तकं वाचायला, गाणी ऐकायला, मस्ती
करायला आणि फिरायला खुप आवडते. त्यामुळे मी माझ्या ब्लॉगमध्ये या सगळ्यावर तर
लिहणारच आहे. पण माझं सगळ्यात आवडतं काम आहे ते म्हणजे दुसऱ्याचं ऐकुण घेणं.
दुसऱ्याचं ऐकून घेणं म्हणजे चोरून ऐकणं असं नाही हा.. आजकाल अनेक जण बोलत असतात की
माझं कोणी ऐकून घ्यायला नाही, काही सांगायला गेले की लगेच
सल्ला द्यायला सुरूवात करतात त्यामुळे त्या व्यक्तीला काही न सांगितलेलंच बरं.. पण
मला समोरच्या व्यक्तीला मोफत सल्ला देण्याची सवय नाही. त्यामुळे माझ्या परिचयातील
अनेक जण माझ्याशी त्यांचे अनुभव, अडचणी शेअर करतात. मुळातच
हे सगळं सांगताना त्यांना विश्वास असतो की त्यांच्या व्यक्तीगत गोष्टी मी कुणाला
सांगणार नाही..
वाचण्याचा छंद मला शाळेपासून आहे.. माहितीपर
पुस्तके, रहस्यमय कथा वाचायला खुप आवडतात. हसरे दु:ख, नॉट विदाऊट माय डॉटर, सेतू ही माझी
आवडतं पुस्तकं. तशी बाबा कदम यांची लव्ह स्टोरीची पुस्तके दहाविला असताना
वाचलेली.. त्यामुळे त्या विषयावरची पुस्तकं आता वाचत नाही.. आणि हा सध्या ‘शोध’ हे इतिहासावर आधारलेलं पुस्तकं वाचतेय. इंग्रजी अनुवादीत पुस्तकं मला खुप आवडतात..
ट्रॅकिंग आणि फिरायची सुद्धा आवड आहे. पण, आवड जोपासणं कठिण आहे. आता का ते
विचारू नका.. सांगेण सावकाश. त्यामुळे खुपवेळा हिरमुस होतो मग यावर रामबाण उपाय
म्हणजे म्यूझिक... आणि त्यातल्या त्यात सॅड, रोमँटिक साँग मध्ये वेळ घालवल्यावर मन
पुन्हा एकदा स्वत: सावरतं... त्यालाही आता समजलंय सगळंच काही मागितल्या क्षणी मिळत नाही कारण
हे आयुष्य आहे...
Bhari lihilays... tuze Vichar nakkich vachayla aawdtil Fredo :) All the Very Best...
ReplyDeleteBhari lihilays... tuze Vichar nakkich vachayla aawdtil Fredo :) All the Very Best...
ReplyDeleteyes pakka... visit karat raha
Delete