खूप काही करायचंय आयुष्यात... खूप फिरायचंय, नाही फिरण्यापेक्षा भटकायचंय.. मनसोक्त. सगळ्या हौशी पूर्ण करायच्यायत.. खूप लिहायचंय, खूप वाचायचंय.. थोडक्यात सांगायचं तर या आयुष्याचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. पण काहीच मनासारखं होत नाहीये.. नेहमी कुठे न् कुठे गाडी अडकते.. बोगस वाटतं मग हे सगळं. 
  दररोज उठायचं आणि मग तिचं बस, तिच लोकल वारी, तोच रस्ता तेच दिवसभराचं काम. काहीच नवीन नाही.. उब आलीये या बिझी, रटाळ शेड्युलची.. हम्म्म
  पण मग करणार काय? हाच 'मोठा' नाही पण प्रश्न आहे हे नक्की.. माझा एकटीचाच नाही तर या मुंबईत राहणाऱ्या कितीतरी मुंबईकरांचा.. याचं उत्तर क्वचितच कोणाकडे असते. लाईफ इंटरेस्टिंग बनवण्याचे 'फंडे' ते यालाच म्हणतात. ज्यांच्याकडे नाहीत ते थोडा वेळ शांत बसून भूतकाळ आठवतात किंवा गाणी ऐकतात नाहीतर स्वतः च्या नशिबाला आणि आयुष्याला दुषणं देत वेळ मारुन नेतात... 
हे असंच असतं... चलो बाय स्टेशन आलं. पुन्हा भेटू.

Comments

Popular posts from this blog

24/7 घरात बसणं...

"गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी"

फिशरमॅन व्हिलेज