"गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी"




'उठा उठा पहाट झाली, मोती स्नानांची  वेळ आली' दिवाळी सणानिमित्ताने टिव्हीवर अॅड आल्यावरच हे ऐकायला मिळायचं.. या अॅडमध्ये मला कधी काही विशेष वाटायचं नाही कारण अभ्यंगस्नान आणि त्यात मोती साबणाचं महत्त्वच काय असतं हे माहित नव्हतं... 

दोन-तीन दिवसाआधीचं म्हणजे 12 ऑक्टोबरला सतीश शिंदे सरांनी मला एक व्हॉट्स-अॅप मॅसेज केला.. दिवाळी सणाच्या आठवणीवर आधारलेला.. अंधेरीच्या प्लेटफार्म नंबर 6 वर ट्रेनची वाट पाहत उभी होती तेव्हा तो मॅसेज मी वाचला. खरंतर अंधेरी स्टेशनवर नोकरीसाठी येणं म्हणजे कोणत्यातरी चुकीची शिक्षाच मिळतंय असं मला वाटतं. एक तास बसमधुन गर्दीचे धक्के खात प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर चर्चगेटवरून येणाऱ्या भरगच्च ट्रेनमध्ये चढायचं आणि उभ्याउभ्या प्रवास करायचा असं हे रूटीन असतं. या अशा प्रवासात सगळेच प्रचंड त्रासलेले दिसतात. मनाला विरूंगुळा मिळेल असं काहीचं या प्रवासात घडत नाही उलट ट्रेन्स उशिरा आहेत किंवा अमुक-अमुक ट्रेन आज या प्लॅटफॉर्म येणार असंच काहीसं आणखीन त्रास वाढवणार ऐकायला मिळतं.. या सगळ्या थकेल्या रूटीनमध्ये 12 ऑक्टोबरच्या दिवशी आलेला  दिवाळी मॅसेजने माझ्या मनाला खुप प्रसन्न केलं.. खुल्लमपणे बोलायचं तर ' दिल खुश कर दिया'... 

 
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय होतं या मॅसेज मध्ये.. तर या मॅसेजमध्ये होत्या आठवणी... बालपणीच्या गोड आणि न विसरता येणाऱ्या आठवणी... सहामाही परिक्षा संपल्यानंतर गावाकडे जाण्याची ओढ.. त्यातच हळूहळू सुरू होणाऱ्या गुलाबी थंडीसोबत दिवाळीची तयारी मग साफ-सफाई, फराळ, उटणं मोती साबणाचं पहिलं स्नानफटाके, रांगोळी, पणत्या, रोषणाई या सगळ्याची धुम सुरू होते.. चार दिवसात जशी दिवाळी संपते त्याच वेगात जणू आपलं रम्य बालपणही हरवल्याची भावना आत्ता सगळ्यांच्या मनात आहे.. कारण दरवर्षी येणारी हि दिवाळी, प्रत्येक वर्षी नवीन आनंद देत असते.. तो आनंद हरवल्याची ही भावना आहे..  

मी फक्त एकाच वर्षी पारंपारिक पद्धतीने दिवाळी सण साजरा केलाय आणि ती ही महाबळेश्वर जवळच्या वाई गावात.. फक्त एकदाच. पण, तो अनुभव, ते दिवस इतके सुंदर, विलक्षण होते की त्या आठवणी बनून  कायमच्या माझ्या स्मरणात राहिल्या. पुण्यात असताना माझी हॉस्टलमधली रूममेट पायल शहा हिच्या घरी मी खास दिवाळीसाठी गेलेली. तेव्हा पहिल्या दिवसापासुन मला दिवाळी सण साजरा करता आला. अभ्यंगस्नाच्या दिवशी काकीनं आमच्या चेहऱ्याला, हाता-पायाला सुगंधी उटणं लावलेलं. त्याचा जास्त ग्लो आला पाहिजे म्हणून मी आणि पायलने मुद्दाम उशिरा अंघोळ केलेली.त्यानंतर वाईच्या बावधान टेकडीवर एका मंदीरात दर्शनाला गेलेलो तिकडे मग अगदी लहान मुलांसारखं खांबाबास खेळ खेळलेलो.  
माझी मैत्रिण व्यापारी वर्गातले आहेत त्यामुळे त्यांच्या घरी धनतेरसची पुजा लक्ष्मीपुजन हे सगळं संध्याकाळी केलं जातं.. जेणेकरून सकाळी लोकांना काही अडचण येऊ नये त्यांना काही कमी पडलं पाहिजे नाही त्यामुळे सकाळी दुकानं सुरू ठेवून मग संध्याकाळी 7 च्या सुमारास आपल्या घरी पुजा करायची असा त्यांचा पायंडा आहे.. त्यामुळे पुर्ण दिवस आम्ही मुलं पुजेची तयारी करण्यात बिझी असायचो.. या तयारीमुळे मी फुलाच्या माळा, वाती करायला आणि चक्क रांगोळी काढायला (थोडी थोडी) शिकली. स्वत:हून फटाक्याच्या वातीला आग लावून फटाके सुद्धा फोडायला मिळाले. थोडक्यात या सणानिमित्ताने खुप काही नव्या गोष्टी मला या दिवाळीत करायला पाहायला मिळाल्या. 
या एका दिवाळीमुळे मला या आठवणी मिळाल्या ज्या आठवल्यावर आजही खुप प्रसन्न वाटतं चेहऱ्यावर एक स्मितहास्य येतं. त्यामुळे बालपणात गावाकडे जाऊन सगळ्या कुटूंबासोबत साजरी करत असलेलो दिवाळी, जेव्हा विस्मरणात जायला लागते तेव्हा तो आनंद हरवतो आणि मग अशाच भूतकाळातल्या आठवणीचे मॅसेज वाचत पुन्हा भूतकाळात हरवून जातो... 
  

Comments

  1. खूप छान लिहलं आहेस फ्रेडी.गावाकडे, नातेवाईकांमध्ये प्रत्येक क्षण नवीन अनुभव देणारा असतो.

    ReplyDelete
  2. खूप छान लिहलं आहेस फ्रेडी.गावाकडे, नातेवाईकांमध्ये प्रत्येक क्षण नवीन अनुभव देणारा असतो.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Gayatri... and Happy Diwali To You

      Delete
  3. Words r placed in proper order.. it's awesome... Keep writing 😘😍

    ReplyDelete
  4. Sunder khup sunder. It took me in my childhood for a moment, and that's marvellous

    ReplyDelete
  5. खूप छान, दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपले बालपण हरवून बसलो आहोत. पण या सणांच्या निमित्ताने आपल्या बालपणातील आठवणी जाग्या होतात, हाच काय तो आनंद.

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणूनच आयुष्यातले आनंदाचे क्षण रिवांईंड करायचे... लाईफ रिस्टार्ट केल्यासारखं वाटतं..

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

24/7 घरात बसणं...

नदी के उस पार...