24/7 घरात बसणं...
24/7 घरातं बसणं... यावर आत्ताच्या घडीला सगळ्यांची रिअँक्शन एक हात डोक्यावर, एक हात कंबरेवर आणि बटाट्यासारखे डोळे मोठे करून बापरे ! 😧😮 अशीच असेल. साहजिकच आहे, सवयच नाहीये ना. हा एक-दोन दिवस काहि जण पूर्ण वेळ घरात बसू शकतात. पूर्ण आठवडाभर काम केल्यावर एक दिवसाची सुट्टी घरातच घालवावी, आराम करावा, घरातील काही कामं असतील तर ती आटोपून घ्यावी, पुढच्या आठवड्याची तयारी करायची किंवा निवांत पडून राहून पुस्तक वाचायचं, नाहितर वेबसिरीज, मुव्ही बघुन घ्यायचं. काही नाहितर कुंभकर्णा सारखं झोपून राहायचं आणि आयत्या बिळावर नागोबा सारखं दोन वेळचं जेवण जेवून घ्यायचं. मात्र, त्यालाही काहिक अपवाद आहेत. अख्खा आठवडा काम केल्यावर एक दिवस पार्टी तो बनता है बॉस !! मग तर काय फक्त मज्जाच करायची असेल तर लंच पार्टी, डीनर पार्टी अरेन्ज करायची. नाहि तर ट्रँकिंग किंवा जवळच्या ठिकाणी पिकनीकला जायचं. या एक दिवसातही काहि जणं पायाला भिंगरी लावल्यागत इकडे-तिकडे हिंडत असतात. विन्डो शॉपिंग, शॉपिंग, खाऊ गल्लीचं खा...